You are currently viewing विद्यार्थी कला केंद्र, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.

विद्यार्थी कला केंद्र, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.

मुंबई येथील, विद्यार्थी कला केंद्र मुंबई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा, इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम यश क्रमांकाचा बहुमान पटकावला.
यामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा साकारली होती .
नीलने आतापर्यंत 110 स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविली आहेत.
त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष निलेश मोरजकरर यांचे सहकार्य लाभले आहे.
त्याचबरोबर नीलचे आई आणि वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.
विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 9 =