You are currently viewing फोंडाघाटच्या राजाला भावपूर्ण निरोप

फोंडाघाटच्या राजाला भावपूर्ण निरोप

फोंडाघाट

श्रीगणेश तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणपती उत्सवाची सांगता आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने पार पडली.गणपती बाप्पा मोरयाsss पुढच्या वर्षी लवकर याsss मोरया रे बाप्पाsss मोरया रेssss च्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच संततधार पर्जन्यवृष्टीमध्ये आणि डीजेच्या तालावर, युवाईच्या थिरकण्यावर “फोंडाघाटच्या राजाची” विसर्जन मिरवणूक उत्साहामध्ये पार पडली. उगवाई नदी तीरी आरती होऊन गणपती बाप्पाला सुख समृद्धी आणि निरामय आरोग्यासाठी सांगणे करून विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वच सद्गतीत झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा