You are currently viewing आठवणीतली आई

आठवणीतली आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आठवणीतली आई*

तू गेलीस निघुनी आई
का केलीग एवढी घाई,
हितगुज राहुनी गेले काही
मी स्वप्न मनी ते पाही.

तुझ्या संगतीच्या खुणा
आठवल्या पुन्हा-पुन्हा,
त्या चित्ररूपी कोरल्या
हृदयाच्या सिंहासना.

ते वारे चाटून जाई
भासे फुंकर जणू मायेची,
जसा कृष्णसखा बावरला
ऐकुनी साद त्या यशोदेची.

कळप फुटे हम्बरे कोकरू
मि वाट तुझीग पाही,
चित्ती दवडले नाही
ते गीत तुझे मी आई……………….

संजय माकोणे
9623949907

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =