You are currently viewing होमगार्डच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरी उघड

होमगार्डच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरी उघड

चंदगड येथील अल्पवयीन मुलगा ताब्यात

सावंतवाडी

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून मोबाईल घेवून पळालेल्या अल्पवयीन मुलाला होमगार्डच्या जागुरकतेमुळे ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडी बस स्थानकात रात्रीच्यावेळी सेवा बजावणाऱ्या होमगार्ड बस्त्याव पिन्टो यांच्यामुळे हा प्रकार निदर्शनास झाला. बस्त्याव यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर त्याची चौकशी करुन सावंतवाडी पोलिसांनी त्याला चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील यांनी घटनेस दुजोरा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 18 =