You are currently viewing भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प.वतीने ” शिक्षक दिना ” निमित्त सत्कार

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प.वतीने ” शिक्षक दिना ” निमित्त सत्कार

वेंगुर्ले

गुरु ब्रम्हा,गुरु विष्णू,गुरु देवो महेश्वरा,गुरु साक्षात परब्रम्ह तस्मेय गुरुवे नम:

माजी निवृत्त शिक्षकांना हळद,कुंकू लाऊन व दिप ओवाळून,साष्टांग नमस्कार करुन शिक्षकांचे पूजन करुन “शिक्षक दिन” साजरा करण्यात आला. यावेळी अ.वि.बावडेकर हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक प्रकाश शिरोडकर यांचा त्यांच्या कुटुंबियांन समवेत भाजप,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,उपसरपंच राहुल गावडे यांच्या हस्ते  शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक मनोहर होडावडेकर गुरुजी यांचा गुलाबपुष्प देऊन भाजप,शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी व उपाध्यक्ष संतोष अणसूरकर यांच्या हस्ते सत्कार सत्कार झाला.

माजी शिक्षक दिवाकर शिरोडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे,चंद्रशेखर गोडकर,रेडी आरवली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे,महादेव नाईक व रेडी येथील भाजप पदाधिकारी पृथ्वीराज राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सर्वा सोबत भाजप, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + sixteen =