You are currently viewing …..शिक्षक दिन….
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

…..शिक्षक दिन….

*जागतीक साहित्य कला व्याकयित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*……शिक्षक दिन….*

आपल्याला कळायला लागल्यापासुन आपण प्रत्येकाकडून काहीना काही शिकत असतो.. आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक शिक्षक भेटतात आणि आपले आयुष्य समृद्ध करुन टाकतात .. घरापासुन सुरुवात होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत वेळोवेळी शिक्षक भेटत असतात..
संपूर्ण महाराष्ट्र., देश आणि देशाबाहेरील माझे वाचक हेही माझे शिक्षकच आहेत कारण त्यांच्यामुळेच मी रोज नवनवीन विषय मांडु शकते आणि तुम्ही माझ्या लेखणीवर प्रचंड प्रेम करता.. माझ्या विचारांवर प्रेम करता.. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.. कायमच माझ्या शिक्षकांच्या ऋणात राहायला आवडेल…
या उच्च दिनी कालचा एक किस्सा शेअर करावा वाटतो.. काल मी लिहीलेला लेख म्हणजे मोलकरणीला पोट्भर जेवु घाला म्हणजे खऱ्या अर्थाने गौरी पुजन होइल या वाक्यावर एका स्त्री वाचकाची आलेली प्रतिक्रिया जशीच्या तशी लिहीतेय.. लिहिताना अभिमानाने उर नक्कीच भरुन आला.. त्यांचं नाव आहे स्मिता कदम, त्यांच्याकडे दरवर्षी गौरीची सवाष्ण जेवु घालतात आणि जेवायला येणारी त्यांची मैत्रीण असते याहीवेळी ती जेवायला येणार होती आणि त्यांनी माझा लेख वाचला आणि त्यांनी त्यांच्याकडे शेतात कामाला येणाऱ्या दोन स्त्रीयांना आधी जेवण दिलं.. त्यांची ओटी भरली आणि मगच त्यांच्या मैत्रीणीला त्यांनी जेवायला दिलं आणि मग मला फोन केला आणि म्हणाल्या तुम्ही माझ्या विचारांची दिशा बदलली.. खरं तर मी काहीच केलं नाही त्यांनी माझ्या लेखणीतुन प्रेरणा घेउन स्वतःला बदललं .. मला वाटतं त्याच माझ्या शिक्षक आहेत कारण त्यांनी माझ्या विचाराना अजुन वाट मोकळी करुन दिली.. माझ्या प्रत्येक वाचकाना हीच विनंती आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही साहित्यिकाचं साहित्य वाचाल तेव्हा ते स्वतःमधे उतरवुन स्वतःची प्रगती करुन घ्या.. कुठल्याही पारंपरिक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्यामागे काय कारण असेल हे जाणुन घ्या.. कारण प्रत्येक गोष्टीला रिझन आहे.. आपण इथे आहोत यालाही कारण आहे आणि मी लेखिका का आहे यालाही कारण आहे..
नोव्हेंबर मधे माझ्या नवीन कादंबरीचे प्रकाशन आहे..तुमच्या सगळ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे..
माझे सगळे लेख allwritessonal.wordpress.com यावर वाचायला मिळतील..
याशिवाय मी फेसबुकआणि इंस्टावर आहे.. तिथेही फॉलो करु शकता.. युट्युबवर sonalcreations या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्यावर सेक्सरसाईज या नावाने व्हीडीओ आहेत तेही जरुर पहा..

सोनल गोडबोले
लेखिका,अभिनेत्री
8380087262

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =