You are currently viewing कुंभवडेत खासदार अरविंद सावंत यांचा येथे सत्कार

कुंभवडेत खासदार अरविंद सावंत यांचा येथे सत्कार

सिंधुदुर्ग :

 

माजी केंद्रीय मंत्री व दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची शिवसेना नेतेपदी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नियुक्ती केली. अरविंद सावंत हे कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील आपले मुळ गावी गणेश उत्सवानिमित्त आले असता कसाल बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक व कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते महेश तावडे व गिरणी कामगार सेनेचे सरचिटणीस पांडुरंग गावडे यांनी भेट घेतली. महेश तावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ तर पांडुरंग गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन खासदार अरविंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, गौरीशंकर खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथमेश सावंत यांनी प्रकाशित केलेल्या गणेश उत्सव शुभेच्छा दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =