You are currently viewing शेतकरी आणि सैनिकांना सक्षम करण्यासाठी शिंदे सरकार सोबत काम करणार – ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार

शेतकरी आणि सैनिकांना सक्षम करण्यासाठी शिंदे सरकार सोबत काम करणार – ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार

कणकवली :

 

कणकवली येथे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे भव्य स्वागत व सत्कार शिंदे सरकार समर्थक यांच्या तर्फे करण्यात आला. शिंदे सरकार मध्ये सामिल झाल्यानंतर ब्रिगेडियर सुधीर सावंत प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते.

कणकवली शिवाजी चौक येथे कार्यकर्त्यांनी जल्लोषात ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले व नंतर मिरवणुकीद्वारे मातोश्री हॉल मध्ये भव्य स्वागत केले.

यावेळी त्यांचा सत्कार धर्मवीर आनंददिगे चित्रपटाचे लेखक व श्रीकांत फाऊंडेशन चे संचालक प्रदिप ढवळ यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. शेतकरी आणि सैनिक यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मी शिंदे सरकार मध्ये प्रवेश केला आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत धाडशी नेतृत्व आहे. त्यांनी राजकारणातल्या घराणेशाहीला आळा घालुन एक नविन आदर्श निर्माण केला आहे. अश्या धाडशी नेतृत्वाच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. शेतकऱ्यांच्या आणि सैनिकांच्या विकासासाठी काम करण्याचे वचन मुख्यमंत्री यांनी दिल्यामुळेच मी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे असे ब्रिगे सुधीर सावंत म्हणाले.

धर्मवीर आनंद दिघे चित्रपटाचे लेखक प्रदिप ढवळ यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री आहेत. असे ते म्हणाले. ब्रिगे सुधीर सावंत यांच्या प्रवेशाने शिंदे गटास पाठबळ मिळेल असे ते म्हणाले.

सत्कार कार्यक्रमास महाराष्ट सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष विजय पाटिल, कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, कोषाध्यक्ष तुकाराम सूर्यवंशी सचिव निंबाळकर, कोल्हापूर चे अध्यक्ष संजय माने, नारायण देसाई, समीर खानोलकर, साताऱ्याचे अध्यक्ष अप्पासाहेब पडवळ उपाध्यक्ष रफीफ इनामदार, कार्याध्यक्ष प्रशांत कदम सचिव संजय लाड, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष पी टी परब व माझी सैनिक बहू संख्येने उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल म्हणाले शेतकऱ्यांना व करकर्त्याना ताकद देणारा खरा नेता ब्रिगे सुधीर सावंत यांच्या माध्यमातून मिळाला असून यापुढे आम्ही जोमाने काम करणार आहोत असे म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, माजी नगरसेवक भुषण परुळेकर, भास्कर राणे , शरद वायगणकार, बाबू आचरेकर, शेखर राणे, राजेंद्र सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, प्राचार्य योगेश पेडणेकर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन शास्त्रज्ञ डॉ विलास सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन पी टी परब यांनी माडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =