You are currently viewing पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना गणपती भेट

पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना गणपती भेट

जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

27 पोलीस हवालदार व 127 पोलीस नाईक यांचा समवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस नाईक व पोलीस हवालदार यांना गणपती पावला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी 127 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार तर 27 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तात्पुरती पदोन्नती दिली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
पदोन्नती देण्यात आलेल्यानंत पोलीस ठाणे देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण, निवती, वैभववाडी, वेंगुर्ले, सावंतवाडी, आचरा, दोडामार्ग, उपविभागीय पोलीस कणकवली, नियंत्रण कक्ष, मोटार परिवहन, मुख्यालय, स्थानिक गुन्हे अन्वेषण, महामार्ग कसाल, नागरी हक्क संरक्षण, अँटी करपशन, विशेष शाखा, बॉर्डर सेक्यूरीटी फोर्स, गुन्हे अन्वेषण विभाग, सीआयडी क्राईम, ए टी एस, श्र्वान पथक अशा विविध विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना या पदोन्नती देण्यात आल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या पदोन्नतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना गणपती पावला असून कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा