You are currently viewing सौ विद्या काठोळे यांना मातृशोक..

सौ विद्या काठोळे यांना मातृशोक..

*इंदिराबाई राम घाटे यांचे निधन….*

 

अमरावती दि. ३१ – स्थानिक तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळातील महामना मालवीय विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका व डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या अध्यक्षा सौ.विद्या काठोळे यांच्या मातोश्री व अकोला महानगरपालिकेतील माजी मुख्याध्यापिका श्रीमती इंदिराबाई राम घाटे यांचे दिनांक 28 रोजी दुपारी एक वाजता दुःखद निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या. सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व अकोला जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक समितीचे अध्यक्ष श्री राम नारायण घाटे यांच्या त्या अर्धांगिनी होत्या. त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रावार यांच्या अध्यक्षतेखाली स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच नागपूर येथील वर्धमान नगरातील तथागत बुद्ध विहार व अमरावती येथील श्री छत्रपती शिवाजी लोक विद्यापीठात श्रद्धांजलीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथे श्रीमती इंदिराबाई राम घाटे यांना आदरांजली म्हणून पन्नास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके विनामूल्य वितरित करण्यात आली. त्यांच्या मागे त्यांची कन्या सौ. विद्या काठोळे ज्येष्ठ पुत्र व नायब तहसीलदार श्री रविचंद्र श्री अणुचंद्र प्रा.डॉ. हिमचंद्र घाटे व प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे व फार मोठा आप्तपरिवार आहे.

 

– प्रकाशनार्थ प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन IAS अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =