You are currently viewing हरितालिका व्रत……

हरितालिका व्रत……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*….. हरितालिका व्रत…….*

भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरीतालिका पुजन… आपली आजी आई सांगते की या दिवशी उपवास केला की चांगला नवरा मिळतो.. याला काहीजण अंधश्रद्धा म्हणतील.. काहीजण मान्य करणार नाहीत .. काहीजण म्हणतील सोनल कडुन ही अपेक्षा नाही.. स्त्रीया म्हणतील प्रत्येकवेळेस आम्हीच का उपवास करायचे?? .. पुरुषांना चांगली बायको नको का ?? सगळे प्रश्न बरोबर आहेत .. पण यातील परंपरा ,,देव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवुन याकडे सकारात्मकता आणि चांगुलपणा या बाजुने विचार करुयात.. हे जग कशावर चालत असेल तर २ गोष्टीवर सकारात्मकता आणि चांगुलपणा.. इथे जात, धर्म हा भेदभाव नाही कारण भगवान एकच आहे.. सबका मालिक एक म्हणजेच निसर्ग..
या दिवशी कंदमुळे खाऊन मुलीनी उपवास करायचा म्हणजेच काय कंदमुळे आणायला निसर्गात जायचं.. आता हे शक्य नाही.. मग काय शक्य आहे तर घरातील सगळ्यानी म्हणायचे , उपवास कर नवरा चांगला मिळेल म्हणजेच घरात positive energy तयार करायची..एक दिवस पोट रिकामं ठेवलं तर आपलीच ताकद वाढते.. ज्यांना जेवायला मिळत नाही ते उपाशी कसे झोपतात हेही कळेल.. एक दिवस उपाशी राहुन तुमच्या सो कॉल्ड डाएट ला फायदा होवु शकतो.. या दिवशी मैत्रीणी एकत्र येउन गाणी म्हणतात,,झिम्मा खेळतात म्हणजेच व्यायाम होतो.. आता फ्लॅट सिस्टीममधे बसुन पोटं वाढवुन ठेवलेल्याना याचा फायदाच आहे.. फुगडीचे अनेक प्रकार म्हणजे योगासनेच आहेत आणि त्यानिमित्ताने पूर्वी बायका एकत्र येउन हितगुज करायच्या आता wp वर करतात..मी माझ्या नवर्याबद्दल चांगलं बोलले त्याचा आदर केला तरच आपली मुलगी आणि सुन त्यांच्या नवऱ्याबद्दल चांगलं बोलतील हाही एक यामागे विचार आहे.. आपली आई आपल्या बाबांवर प्रेम करते हेच अनुकरण मुलगी करते .. आई म्हणाली सगळे पुरूष असेच किवा वाईट तर मुलगी किवा सुन तसाच विचार करते आणि घर विस्कटायला लागतं.. कितीही प्रगती केली तरी संसार आणि संपूर्ण विश्व हे यावरच चालतं.. आपल्याकडे असलेल्या सणान्मागे हाच उद्देश आहे.. शेवटी सगळ्याना सुख हवय मग ते तर आपल्याच विचारात आहे.. सुख बाजारात विकत मिळतच नाही..
तेव्हा काही गोष्टी या विचारात घेउन वागलं तरच सुख ,समाधान आहे.. मी जिथे लहानाची मोठी झाले तिथे काही गोष्टीमुळे माझं नुकसान झालं पण जे मिळालं ते त्या नुकसानीपेक्षा लाखो पट चांगलं मिळालं.. तेच विचार माझ्या लेखणीतुन तुमच्यामधे पेरत आहे जे प्रत्येकाने आपल्या घरात पेरा आणि उगवणारं झाड हे दिमाखात चांगल्या विचारानी डोलत राहील.. त्याच झाडाखाली बसुन मी सावली घेतेय तशी ती तुम्हालाही मिळावी..
जेव्हा रोज माझा अर्धातास माझ्या वाचकांसाठी देते तेव्हा त्यांनी त्यातुन काहीतरी घेउन स्वतःची प्रगती करुन घ्यावी हीच अपेक्षा आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा…

सोनल गोडबोले
लेखिका,,अभिनेत्री
8380087262

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − three =