You are currently viewing सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेकडे खाती असणाऱ्या व्यापाऱ्यांना QR CODE सेवा

सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेकडे खाती असणाऱ्या व्यापाऱ्यांना QR CODE सेवा

वेंगुर्ले :- आताच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त केला जातो. तसेच कॅशलेस व्यवहारावर करण्यावर लोकांचा भर आहे आणि त्याचाच विचार करून सैनिक पतसंस्थेने संस्थेच्या माध्यमातून मोबाईल ॲप्स, मोबाइल बँकिंग, एन इ एफ टी, आर टी जीएस सारख्या सेवा सुरू केल्या आहेत. त्यातूनच संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे ते म्हणजे संस्थेने आमच्या संस्थेकडे खाती असणाऱ्या व्यापाऱ्यांना QR CODE दिला आहे. QR CODE चे वितरण संस्थेच्या सर्व शाखा मधुन करत आहे. या QR CODE चे वितरण संस्थेच्या वेंगुर्ला शाखेकडून दिनांक २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शाखा कार्यालयात करण्यात आले.

या कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष श्री. गणपत कासार, शाखा संचालक श्री. प्रताप राणे, श्री. मंगेश पेडणेकर, श्री. देवेंद्र गावडे, श्री. रामकॄष्ण मुणगेकर , संचालीका श्रीम. सरोज परब व श्रीम. शुभांगी गावडे त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक सौ. ज्योती देसाई, कर्मचारी श्री. नितीन बेहरे , कु. ज्योती वंडर, कु. काजल गिरप, श्री. शंकर दिपनाईक, श्री. प्रदीप दाभोलकर, श्री. दत्तप्रसाद तांडेल, श्री. जितेंद्र लाड, क्युआर कोड व्यवस्थापक श्री. मयुर गवळी व व्यावसायिक खातेदार उपस्थित होते. यावेळी श्री. गवळी यांनी QR CODE ची माहिती, उपयोग व कसा वापरावा यावर मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =