You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये गणेशोत्सव आनंदात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये गणेशोत्सव आनंदात साजरा

सावंतवाडी :

 

सावंतवाडीत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शाळेचे संचालक रुजूल पाटणकर व सौ. काश्मीरा पाटणकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका दिशा कामत, सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मदतनीस या सर्वांनी मिळून उत्साहात श्री गणेशाचे वाजत गाजत स्वागत केले.

इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करून श्री गणेशाची स्वागत केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. श्री गणेशाच्या आगमनानंतर सर्वांनी मिळून श्री गणेशाला भक्ती भावाने वंदन केले. मोदकांचा नैवेद्य तसेच श्री गणेशाला आवडणाऱ्या दुर्वा व लाल जास्वंदीची फुले वाहण्यात आली. त्याप्रमाणे सर्वांनी गणेशाची आरती केली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी गणपतीवर आधारित समूह भक्तीगीत गायन केले. शिक्षकेतर कर्मचारी व मदतनीस यांनी मिळून मोठ्या आनंदाने फुगड्या देखील घातल्या. सर्वांनी मिळून जल्लोषात गणपती बाप्पांचा जयजयकार केला व सर्वजण गणपती बाप्पांच्या भक्तीमय वातावरणात रंगून गेले. अशा प्रकारे भक्ती भावाने व मोठ्या उत्साहाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 6 =