सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील खासकीलवाडा हेल्दिकॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला रूग्णांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे सदस्य बाळासाहेब बोर्डेकर, उमाकांत वारंग यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर नाईक यांनी शिबीरासह आय.सी.यू. युनिटबद्दल माहिती दिली. तर डॉ. मिश्रा यांनी या शिबीरास शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. रश्मी शुक्ल यांनी केल. यावेळी बाळासाहेब बोर्डेकर, उमाकांत वारंग, डॉ. दिगंबर नाईक, डॉ. धर्मपाल गर्ग, डॉ. रश्मी शुक्ल, डॉ. कुश प्रसाद आदि उपस्थित होते.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर नाईक यांनी रूग्णांची टू डी एको तपासणी केली. तर मधुमेह, उदररोग तज्ञ डॉ. धर्मपाल गर्ग, एमडी आयुर्वेद डॉ. रश्मी शुक्ल यांनी रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. डॉ. रूपेश जाधव यांनी रूग्णांची सोनोग्राफी केली. या शिबिरात ५० हून अधिक रुग्णांनी सहभागी होत तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिराच आयोजन डॉ. कुश प्रसाद यांनी केल. शिबीर यशस्वी होण्यासाठी हेल्दिकॉनचे डॉ. रोहन सातपुते, डॉ. विशाल गुप्ता, सिस्टर तृप्ती, काजल, आरती, शेहनाज, सेजल, आलिया तसेच मावशी नूतन, श्वेता, नलिनी यांचे सहकार्य लाभले. या हॉस्पिटलमध्ये डॉ. दिगंबर नाईक डॉ. धर्मपाल गर्ग, डॉ. रश्मी शुक्ल इतर दिवशी ठरलेल्या वार व वेळेनुसार उपस्थित राहत रूग्णसेवा देत आहेत.