You are currently viewing आचऱ्यातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा

आचऱ्यातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा

टेस्ट मध्ये एक पॉझिटीव्ह

मालवण

संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणारयांना आळा बसण्यासाठी आचरा पोलीसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आचरा तिठ्यावर रॅपिड टेस्ट सुरू केल्याने अवास्तव फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक संचार बंदी चे आदेश दिले आहेत. तरीही काही जण विनाकारण फिरत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आल्यामुळे आचरा पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारयांच्या सहकार्याने अकस्मात आचरा तिठा येथे रॅपिड टेस्ट सुरू केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =