You are currently viewing वैभववाडीतील कोळपे  तंटामुक्ती अध्यक्षांसह, ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

वैभववाडीतील कोळपे  तंटामुक्ती अध्यक्षांसह, ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

कोळपे विभागात भाजपला खिंडार

वैभववाडी

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळपे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशाल जाधव, ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा जाधव, आनंद जाधव, नाजिया पाटणकर यांच्यासोबत राजेश जाधव मुस्कान रमदुल, तोफिक राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला,

यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन मलांडकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, मालवण माजी उपसभापती नाथा मालणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, रोहिदास पवार रमेश चव्हाण नंदकुमार पवार अरुण सरवणकर साजिद पाटणकर आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे कार्याध्यक्ष नजीर शेख यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुस्कान रमदुल हिची युवती तालुका अध्यक्ष वैभव वाडी म्हणून निवड करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =