नवरात्रोत्सवानिमित्त मातोश्री कला, क्रीडा मंडळाच्यावतीने उपस्थितांना मास्कचे वाटप…

नवरात्रोत्सवानिमित्त मातोश्री कला, क्रीडा मंडळाच्यावतीने उपस्थितांना मास्कचे वाटप…

वेंगुर्ला

नवरात्रोत्सवानिमित्त वेंगुर्ला मातोश्री कला, क्रीडा मंडळाच्यावतीने उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले.
वेंगुर्ला-दाभोली नाका मातोश्री कला क्रिडा मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गेचे पूजन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर या मंडळाच्यावतीने मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मातोश्री कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष दादा कुबल, सचिव प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नवरात्रोत्सवा समिती अध्यक्ष विलास गावडे, उपाध्यक्ष कलमेश सामंत, मंडळाचे वसंत तांडेल, सुहास गवंडळकर, जयंत मोंडकर, अवी सडवेलकर, वेर्णेकर, आरोसकर, भूषण आंगचेकर, यशवंत किनळेकर, भूषण सारंग, श्रीकांत रानडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा