You are currently viewing अचिर्णे गावचे सुपुत्र संतोष बोडके यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा..

अचिर्णे गावचे सुपुत्र संतोष बोडके यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा..

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यातील अचिर्णे गावचे सुपुत्र संतोष धोंडू बोडके यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा करण्यात आला. वैभववाडीत त्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच जय मल्हार दुर्गोबा मंडळ अचिर्णे यांच्या संयुक्त विद्यमानाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा २७ रक्त दात्यांनी रक्त केले. कार्यक्रमाला भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विनायक अंकुश वावरे, प्रशांत उमाशे, प्रथमेश कोळेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व राजेश पडवळ ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पडवळ, उपाध्यक्ष संजय रावराणे, सचिव मंदार चोरगे, संजय गुरखे, प्रशांत ढवण, धुळाजी काळे, चेतन बोडेकर, दीपक गजोबार, स्वप्निल शिर्के, संतोष गुरखे, कोल्हापूर येथील जीवनधारा ब्लड बँकेचे डॉ. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नायनिश मोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 12 =