You are currently viewing नेमळे येथील अपघातात गंभीर जखमी कारचालकाचे उपचारादरम्यान निधन…

नेमळे येथील अपघातात गंभीर जखमी कारचालकाचे उपचारादरम्यान निधन…

सावंतवाडी

नेमळे येथे झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर जखमी असलेल्या चालकाचे आज गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. विशाल वसंत हाटले (४०) मालवण-गोठणे असे त्याचे नाव आहे. हा अपघात काल सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाराप- पत्रादेवी महामार्गावर टायर फुटल्यामुळे घडला होता. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण किरकोळ आणि चालक हाटले गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना आज त्याची प्राणज्योत मालवली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 4 =