You are currently viewing रक्ताचा तुटवडा भरण्यासाठी तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे…

रक्ताचा तुटवडा भरण्यासाठी तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे…

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आवाहन

सावंतवाडी

सद्य स्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असून, जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे. तसेच कोरोना ग्रस्त होऊन बरे झालेल्या रुग्णांनी देखील प्लाझ्मा डोनेशन साठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही क्षणी याची गरज भासत आहे. ब-याच कोरोना रुग्णांसाठी प्लाझमा डोनर शोधणे जिकरीचे जात असून मुंबई, गोवा बांबोळी याठिकाणी प्लाझमासाठी सिंधुदुर्गातुन डोनर पाठवावे लागत आहेत. अशा कठीण प्रसंगी सर्व रक्तगटाच्या युवा रक्तदात्यांनी रक्तदानसाठी कायम कटीबद्ध राहत रक्तदाता संघटना व संस्थांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो म्हणून रक्तदान, प्लाझमा दान करून आपले कर्तव्य पार पाडावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =