You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिपरीचारिका नयना मुसळे यांना पंतप्रधानांकडून गौरवपत्र

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिपरीचारिका नयना मुसळे यांना पंतप्रधानांकडून गौरवपत्र

कणकवली :

 

कोविड महामारीनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण विभागाच्या अधिपरीचारिका नयना अभिजीत मुसळे यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवपत्र पाठवून अभिनंदन केले आहे. नयना मुसळे या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका या पदावर कार्यरत असून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात केंद्रावर महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून त्यांचा गौरव करत असताना त्यांच्या कामाची ही दखल घेतल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. मुसळे यांच्या या गौरवाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =