You are currently viewing प्रेम म्हणजे नक्की काय असतं…?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं…?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रेम म्हणजे नक्की काय असतं…?*

 

मनाच्या गाभाऱ्यात कुणीतरी लपून बसावं अन् आंतरिक ओढीने मनाला अलगद स्वतःकडे खेचून घ्यावं..अगदी तसंच नकळत कुणीतरी मनमंदिरी विसावतं आणि मनाला वेडावून सोडतं..

ग्रीष्मातील तप्त उन्हाने तरसलेल्या धरेला पावसाच्या सरींनी चिंब भिजवावं नि मृदगंधाने सारा आसमंत गंधीत व्हावा तसाच तिच्या येण्याने मनाचा गाभारा गंधाळून जातो, रोम रोम पुलकित होतो..अन् तिच्या गंधित सहवासात आपण एवढे गर्क होतो की, क्षणाक्षणाला तिचेच भास होतात.. ती समीप नसली तरी तिचा मोरपंखी स्पर्श तनामनाला जाणवत राहतो.. अन् मागे वळून पाहिलं की, नकळत गालावर कळी खुलते.. मान लज्जेने झुकते…कुणीच मागे नसल्याने खजील मन स्वतःवरच हसते..

ती सोबत असावी.. नजरेत नित्य दिसावी..तिचे कोमल हात अलगद तनाला स्पर्शून जावेत..हवेत उडणाऱ्या रेशमी कुंतलांनी हळुवारपणे गालांशी खेळावे अन् त्या स्पर्शाने मोहरलेल्या तनावर काटा उभा रहावा..तिचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.. तिचं सान्निध्य हेच जणू जगणं बनून जातं..

 

का..? माहितीय कुणाला..??

कारण..,

ते प्रेम असतं…!

*प्रेम हे प्रेम असतं..*

*सहवासाने नकळत होतं*

*कुणास ते नकली वाटतं*

*कुणाचं आयुष्यच बनतं*

 

प्रेम कधी सहजच होत नसते, ते एकमेकांच्या सहवासाने आंतरिक ओढीने खोलवर रुजते..कोमल भावभावनांमध्ये उमलते, नाजूक बंधनात मोहरते, फुलते, बहरते..!

ती आली, तिने मागे वळून पाहिलं, ती गोड हसली, पाहताक्षणी आवडली अन् तिच्यावर प्रेम जडलं…😍

छे, छे, छे …!

असं कुठे असतं का प्रेम..?

प्रेम म्हणजे गुलाबाचं फूल नव्हे जे आवडलं म्हणून तोडलं अन् शर्टच्या खिशाला लावून सुगंध घेत मिरवलं…

कुणाच्या रंगरुपावर भाळते ते कुठले प्रेम..?

कुणाच्या शरीरावर पाघळते ते कुठले प्रेम..?

प्रेम ही विलक्षण भावना आहे.. अंतरीतून प्रसवते…!

नभांगणीच्या चांदण्याही प्रेम कुंतलांत माळते..!

ती दिसताच चोरून तिला पाहण्यास नजर चहूकडे फिरते नि नजरेस नजर भिडताच…ओठांचे थरथरणे, गालावर आपसूकच लाली चढणे.. खोलवर नजरेत तिला सामावून घेणे.. नयन पाकळ्यांच्या आड दडवून ठेवणे…

अगदी निष्पाप..निर्मळ मनाने..!

ती चालताना तिच्या मागे मागे जाणे..तिच्या गुलाबी गालांवर लज्जेने लाली चढणे..नजरेने नजरेशी बोलणे..तिच्या हिंदोळ्याने डुलणाऱ्या झुमक्याचे तिच्या गालांशी कुजबुजणे..तिच्या गालावरच्या थेंबामधुनी जणू ओघळतो मोती असा भास होणे..पायीच्या पैंजनांनी छमछम् वाजणे..अन् गालावरच्या खळीने तिच्या अंतर्मनातले बोलणे.. सारं काही विलक्षण..!

 

पण…, या प्रेमाला असतो का कुठला खास दिवस..?🤔

प्रेमाचा कुठला एक दिवस नसतोच बरं..!

तर प्रेम दिवसागणिक वाढते..

पावसाच्या सरी बरसतात तसे प्रेम तिच्यावर बरसते.. एक दिवस नव्हे तर आता चक्क प्रेमाचे आठवडे साजरे होतात..

“रोझ डे”..पासून सुरू होणारं प्रेम “व्हॅलेंटाईन डे” येताच उकळी फुटून ऊतू जातं अन् नंतर ते वाढतं की ओसरतं कुणाला दिसत..?

“रोझ डे” म्हणे लाल गुलाब देऊन प्रेम व्यक्त करायचा दिवस..

शाळेत जाताना कुंपणावरची लाल गुलाबाची फुले कितीदा कुणा कुणाला दिली, कुणावर गुलाब पाकळ्यांची उधळण केली.. कसं आठवायचं बरं..!

लाल गुलाब दिल्याने प्रेम होतं हे तेव्हा कुणाला ज्ञात असायचं..? निष्पाप मन, कुठे कळायचं प्रेम बिम..?

अन् तो “प्रपोज डे” काहीतरी विलक्षणच…म्हणजे समथिंग डीफरेंट…!

तिच्या मागून फिरता फिरता गल्लोगल्लीच्या रस्त्यांना सुद्धा खड्डे पडायच्या..चपलाही झिजून जायच्या.. अन् धीर करून तिला विचारायचं तर तिने म्हणायचं, “आजच्या दिवसातील तू पाचवा…”

मग काय…? पांडवकालीन युगात जन्मल्याचं सुख घेऊन वास्तव दुनियेत गपगुमान माघारी फिरायचं..!

अहो…. “प्रपोज डे” म्हणजे थोरामोठ्यांच्या समोर चारचौघात मान खाली घालून बसणे..थरथरणाऱ्या हातातील चहाचा कपातील चहा न सांडताच अलगद तिच्या हातातून आपल्या हातात घेणे…कुणी दिला हे फक्त तिचा हात पाहूनच ओळखणे…अन् काहीही न बोलता, तिची पसंतीही न जाणताच मानेने तिला पसंती देणे…!

“चॉकलेट डे” बाबत तर विचारायलाच नको.. एकदा पसंती झाली की कधी तोंडात साखर पडते या प्रतिक्षेत उगाच आपलेच चॉकलेटी ओठ लाल करत बसणे..

अन् तिची पहिली भेट..!

ही कल्पनाच अंगावर शहारे आणायची… कित्ती स्वप्ने रंगत असायची रिकामटेकड्या मनात..

“बेटा मन में एक लड्डू फुटा”🍘 सारखे खुशीचे लाडू फुटतच नसायचे तर जिभेवरच विरघळून जायचे… तोंडाला क्रीम काय नि पावडर किती…केसांवरून दहावेळा कंगवा फिरायचा..

कधी मिथुन कधी अनिल कपूर सारखा भांग पडायचा.. ती भेटणार अन् बोलणार की फक्त लाजणार..? डोळ्यात पाहणार की डोळ्यातच प्रतिबिंब बनून राहणार..!

स्वप्नांच्या रंगेल दुनियेत दंगुन राहिल्यावर कुठलं चॉकलेट अन् कुठला टेडी…! तिच्या एका शब्दातच गप्पगार..! तोंडातून शब्द फुटेल तर शपथ..!

तिची पहिली भेट हाच अनमोल ठेवा असायचा..

पहिल्याच भेटीत दिली.. घेतली जायची वचने… आयुष्यभर सोबत राहण्याची..! आता त्याला “प्रॉमिस डे” म्हणा की अजून काही..

पण निभावण्याची हिम्मत असायची..

आजकाल सकाळी सूर्योदयाला झालेलं प्रेम संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीच संपतं.. तरीही बागेत दिसतात काही युगुल फुलपाखरे.. हातात हात घालून खोटी खोटीच “प्रॉमिस” करताना अन् उगाच मिठी मारत “हग डे” साजरा करताना..! त्या मिठीत असते का प्रेम..? की अंगाशी सलगी करण्याची मनात उत्पन्न झालेली वासनेची भूक..?

खरंच…,

*मिठी या शब्दातच किती मिठास आहे…*

*नुसता उच्चारला तरी तृप्ततेचा भास आहे*

खरंय, उगाचच बदनाम झाली मिठी..!

मिठी या शब्दातच मन तृप्त करण्याची ताकद असते.. उगाच नाहीत मारत मिठी…

आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठीत घेताना, हृदयाशी कवटाळताना “काय मिळवतो यापेक्षा आपण तिला मिठीतून काय देतो”… हे महत्त्वाचं असतं..

आईने मुलाला मारलेली मिठी ही प्रेमळ, आश्वासक..!

खऱ्या प्रेमाचं अन् गाढ विश्वासाचं प्रतिक म्हणजे नवरा बायकोची मिठी..!

भावंडे तर एकमेकांच्या मिठीत सहज मावतात..अन् मित्र मैत्रिणींनी मारलेली मिठी म्हणजे आलिंगन !

कामातुर व प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी दीर्घ विरहानंतर एकमेकांच्या मिठीत घट्ट शिरतात तेंव्हा ती मिठी सुलभ व अभूतपूर्व आनंदाची देणगी देऊन जाते.

ज्या भावना शब्दात व्यक्त होत नाहीत..त्या भावना.. कॅडबरीच्या चॉकलेट सारख्या मिठीत पार विरघळून जातात..अंतर्मनास समाधान देतात..!

एकदा मिठी पडली की ती सैल होऊच नये असं वाटतं.. वाढलेली हृदयाची धडधड हृदयातून हृदयालाच ऐकू येते…

स्पर्शातून जाणवतं माणसाचं मन, श्वासातून भावना अन् स्पंदनातून अंतरीचे विचार..!

नदीने सागराच्या मिठी जाताना उसळतात लाटा अन् आपले विशाल हस्त पसरून सागर अलगद कवेत घेतो सरितेला.. कायमचीच त्याच्या अंतरंगात सामावून जाण्यासाठी..! तशीच असते मिठी उन्हात देखील चांदणं दाखवणारी..तृप्तीची तहान लागलेली..!

चार भिंतीआड होणाऱ्या प्रणय क्रिडेतील मादकता म्हणजे चुंबन..! चुंबन घेतानाचं दृश्य जरी सिनेमात दिसलं तरी आपल्याला कोण पाहतंय का..? असं चोरून पाहणारी आमची पिढी नि आजची सहज चुंबन घेणारी पिढी..”किस डे” देखील सहजच साजरा करते..

चुंबन..प्रेम, उत्कटता, प्रणय, स्नेह, आदर यांचं प्रतीक आहे.. जे आदर, भक्ती, संस्कार दर्शवते..!

“वचनाने समृद्ध, असीम आनंद, धैर्य आणि तरुणपणाची मादक अनुभूती देते आणि म्हणूनच उदात्ततेमध्ये इतर सर्व पृथ्वीवरील आनंदांना मागे टाकते चुंबन”…!

पहिली भेट.. गुलाब देत केलेला प्रपोज..अलगद पडलेली मिठी अन् नकळत जवळ ओढत तिच्या भाळी घेतलेलं चुंबन नि मनात उत्पन्न होणाऱ्या निर्मळ, निष्पाप, शुद्ध भावना न बोलताच नजरेने सारं काही सांगून जातात..

प्रेमाने एकमेकांस मिठीत घेतात…चिरकाळासाठी..!

 

*मिठी कधी न सैल व्हावी..*

*तुझ्या माझ्या भावनांची..*

*ही ओढ अविरत वाढावी*

*मंतरलेल्या क्षणाक्षणांची..*

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक, रत्नागिरी*

 

*YouTube Advt Link👇*

 

*सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक,रत्नागिरी*

*[Spine Care Unit]*

 

*सांधे व मणके यांचे ऑपरेशन टाळणे आता सहज शक्य*

 

*रिप्लेसमेंटऐवजी रिजनरेशन थेरपी उपलब्ध*

 

*🌐https://sanwadmedia.com/125762*

 

🔴 मणक्यांच्या व सांध्यांच्या आजारावर विनाऑपरेशन, विनाटाके व चिरफाड न करता विशेष शुद्ध आयुर्वेद पद्धतीने खात्रीशीर उपचार गेल्या दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या करण्यात येत आहेत.

 

🔴 अतिशय महागड्या तपासण्या व विविध औषधांचा सतत भडीमार करूनही चिकित्सा निष्फळ ठरलेल्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने व गरज लागल्यास पंचकर्म चिकित्सेने आजाराचे निर्हरण गेली दहा वर्षे केले जाते.

 

*तुम्ही खालील समस्यांनी त्रस्त आहात का?*

1) कंबरदुखी, कंबर आखडणे.

2) मानदुखी, मान आखडणे.

3) हाताला, पायाला मुंग्या येणे.

4) पिंढऱ्यांना गोळे येणे.

5) हात, पाय जड होणे, बधिर झाल्यासारखे वाटणे.

6) पायाला मागून ओढ लागणे.

7) मणक्याची झीज होणे.

8) मणक्यात गॅप पडणे.

9) *मणक्यातील चकती सरकणे, नस दबणे.*

10) संधिवात, आमवात, गाऊट a) सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे. b) सांधे आखडणे. c) सांधे गरम होणे.

11) *AVN* (कोरोना नंतर होणारा खुब्याचा आजार.)

या सर्व आजारांवर आयुर्वेदिक चिकित्सा हवी असल्यास त्याचप्रमाणे मणके, खुबा, गुडघे आणि इतर सांध्यांचे ऑपरेशन टाळायचे असल्यास, पेनकिलर व स्टिरॉईडच्या गोळ्या टाळावयाच्या असल्यास एकदा तरी

🎯 *सुखायु आयुर्वेद, शिवाजीनगर, रत्नागिरी* येथे अवश्य भेट द्या.

 

📌 पत्ता : *सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक*

*डॉ. प्रदीप घाटे* (MD-Ayurved)

यशोदीप कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 109, सॅमसंग शोरूमच्या वर, शिवाजी नगर, रत्नागिरी 415612

 

*संपर्क क्रमांक : 8275392430 किंवा 7972960979*

 

*YouTube Link*

👇👇👇

 

🌐https://youtube.com/shorts/ZvzsVvPZh9I?si=ha6EXnLPQ_STIdJ5

 

🌐https://youtu.be/uuuRGBB9sdk?si=0YXdvo_t8wTGF3hZ

 

🌐https://youtu.be/bHS0wDbN7hw?si=1gRGm-0UYmZA3b6X

 

🌐https://youtu.be/6dgRf6CiR4Y?si=14uQxUJg70GT4AsB

 

🌐https://youtu.be/5nVH1xWqar0?si=N58lTJ2vlZTtbplF

 

🌐https://youtu.be/aApNUkJNBsk?si=VGso9Cqa87q6pTV0

 

🌐https://youtu.be/eHiXdvZ4ZdI?si=qt431S_4w9Hi_54Z

 

🌐https://youtu.be/KO5sRVr8HrU?si=puG0V507we3qZ8tZ

 

🌐https://youtu.be/bit2T-xXcM8?si=JCjuHIHSZNH8T0_Z

 

🌐https://youtube.com/shorts/ocriBLLUdsg?si=Qit5gPtx5CNtNsrP

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =