You are currently viewing समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची नागरिकांबरोबरच प्रशासनाची जबाबदारी – वैभव नाईक 

समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची नागरिकांबरोबरच प्रशासनाची जबाबदारी – वैभव नाईक 

बीच क्लिनिंग मशीनचा शुभारंभ…

मालवण

समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे ही नागरिकांबरोबरच प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. त्यानुसार पर्यटकांना येथे आकर्षित करण्यासाठी बीच स्वच्छतेसाठी यानंतरच्या काळातही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

दरम्यान वैभव नाईक यांनी स्वतः या वाहनाचे स्टेअरिंग हाती घेत किनारपट्टी स्वच्छतेत स्वतःचे योगदान दिले.

पर्यटकांना आकर्षित करणारे येथील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या बीच क्लिनिंग मशीनचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज येथील बंदर जेटी येथे करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटन तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण दौऱ्यात किनारपट्टी स्वच्छतेसाठी बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी ही मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, नंदू गवंडी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, आतु फर्नांडिस, राजा शंकरदास, किरण वाळके, स्वप्नील आचरेकर, यशवंत गावकर, शिल्पा खोत, शीला गिरकर, आकांक्षा शिरपुटे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eight =