You are currently viewing झाड माझं!तोडल त्यांनी!

झाड माझं!तोडल त्यांनी!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतीम काव्यरचना*

*झाड माझं!तोडल त्यांनी!*

माझ्या दुःखाचा सदरा
रक्तबंबाळ होवून फांदीवर झोपला
झाड माझ तोडल त्यांनी!मुळं त्याची
काळया मातीतून! हाका देत आहे मला !
माझ्या मनातल गाण
मी माझ्या झाडासोबत गायचो
स्तब्ध होऊन त्याच्यापुढे
हात जोडून प्रार्थना म्हणायचो …….!!
त्याची सहनशिलता नम्रता
जगण्याची उर्मी लाभायची
ऋतुमानाचे आगळे रूप
डोळ्यांचे पांग फेडायची ……….!!!
त्याच्या संगतीत
दुःखही परक वाटायच
ईश्वराच्या संगतीत
जगण्याच बळ लाभायच ……..!!!!
विकारी मन! अहंकारी मन! क्रुर मन !
त्यांना झाड कधीच समजलचं नाही
कारण ते झुडुपांनी सदा होते वेढलेले
काळ्या आईची, जन्मदात्याची ,ईश्वराची हत्या केली!त्यांना झाड उमगलेच नाही !
कधी झाड कळलचं नाही!!!!!
जगणं रक्तबंबाळ झाल माझं
झाड तोडल त्यांनी माझं ….!!!!!!

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा