You are currently viewing माफ कर

माफ कर

*लयभारी… क्षितिजावरची पर्ण साहित्य समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री सुनिता बहिरट लिखित अप्रतिम लेख*

*माफ कर* ! ! !

कशासाठी माफी
अवश्यकता नाहीये माफीची कोण आहे मी यार एका वळणावर आपली भेट झाली गाव माहित ना पत्ता … आता कुठे भेटलो आपण… पण का कुणास ठाऊक लळा लागला हे जगावेगळ नात जिव्हाळा , प्रेम मला मनापासून हव आहे … तु दूर आहेस म्हणून काय झाल ! ! !

मन गुंतून जात तुझ्यात तू उपाशी असला ना तर माझा घास माझा नसतो बघ … तुझ काही दुःखल तर मला न सांगता कळत

बैचैन होत मन कशातही लक्ष लागत नाही एकसार चिडचिड होते बघ …. का होत असाव अस मला मी एकांतात बसून रडते बाबा काय करणार माझे अश्रू पाहून मला लोक वेडी समजतात हसतात माझी घूसमट होते बघ
मी नाही सांगू शकत कोणास कथा माझी एवढा वेळ कोणाकडे आहे सांग बर तू माझ्यासाठी

खरतार माफ कर या शब्दांत फार मोठी ताकत आहे माफी मागणारा दिलदार असावा आणि तू आहेच यात तिळमात्र शंका नाही … नको इतका कोणासाठी उदार होवू जग स्वार्थाने भरल आहे आपल परक ओळखायला शिक इथे लोक फायदा पाहतात आणि जवळ करतात कोण कोणाच नाही तुझ्या गैरहाजरीत जर तुझी आठवण काढली तर समज ते तुझे आहेत .. नको त्याला कवटाळायच सोडून दे … फार त्रास होतो वेळीच सावध हो
नंतर फक्त ओंजळ रिती राहते
भावनाविवश होवून काहीतरी हरवल आहे अस वाटत आणि शोधूनही सापडत नाही गुंता सुटता सुटत नाही
सांज कलता येतात बघ उन्मळून आठवणी सोबत फक्त तुझी
नयनांत ठेवते साठवूनी….

कथा शब्दात मांडते
व्यथा आहे अंतरात
एकांतात बसून मी
उत्तर शोधते नकळत

तुझ काय चाललय माफ कर माफ कर अरे वेडया मी आहे कोण ?

मी धूळ आहे तू फुंकर मारताच उडणारी
एवढा विचार नको करूस

पानगळ होता झाडांची नव्याने वसंताची चाहूल लागते अन् ऋतू बहरून येतो झाडे तरू वेली
हिरवागार निर्सग पाहून लोचने तृप्त होतात कोकिळ कुहूचे गुंजन कानी येते मुंजळ पक्षी एकडून तिकडे बागडतात आनंदाने गीत गायन करतात

हा आनंद केवढा अलौलिक आहे
ते कुठे माफी मागतात क्षणांतच सार विसरतात मी ही तीच आहे समज हवतर कटपुतली
नाही मनात काही माझ्या
हिंदोळ्यावर बसता मागे पुढे जातो पुढे गेला की वाऱ्याची झुळूक तनूला स्पर्श करते
पोटात हलकसा गोळा येतो हिंदोळा खाली आला की मनाला दिलासा मिळतो … तसच जीवन आहे वेडया सुःख दुख येतात तरून निघायचे सुकलेल्या पाचोटीवर पाय दिला तर त्याचा भुगा होतो अर्थात … काय चिमूटभर राख …. आपण तर सजीव माणसं आहोत एकमेकाच्या भावना मन आपण समजून घ्यायला हव

एका शब्दावर तुटणार आपल नातं नाही असा विचारच तू कसां केला…. खर सांगू का तुला तुझ्यात फार जिव गुंतला आहे तुझा राग जरी आला ना …. तरीही मी एकांतात अश्रू गाळते तुझ्यासाठी … तुला नाही समजणार जावू दे ….,,

परत नको माफी मागू ….

नको मागूस माफी
माझ्यासाठी तू खास
नको नात्यास तड़ा
ठेवशील ना विश्वास

सौ . सुनिता बहिरट
शिवजन्मभूमी . आळे

प्रतिक्रिया व्यक्त करा