You are currently viewing आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा “स्पोर्टेक्स – 2022” मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या टेबल टेनिस मुलांच्या संघाने पटकावले उपविजेतेपद

आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा “स्पोर्टेक्स – 2022” मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या टेबल टेनिस मुलांच्या संघाने पटकावले उपविजेतेपद

कुडाळ :

रत्नागिरी येथे दिनांक 20 व 21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या आंतर-महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा “स्पोर्टेक्स 2022” मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या 25 विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, टेबल टेनिस व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. दोन दिवस पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वच खेळांमध्ये सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बॅडमिंटन या खेळामध्ये मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपांत्यफेरी गाठली.

टेबल टेनिस या खेळ प्रकारात मुलांच्या संघाने कृषी महाविद्यालय, दापोली च्या संघाबरोबर झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेतेपद मिळवून उद्यानविद्या महाविद्यालयाची विजयी परंपरा कायम राखली. मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी क्रीडा अधिकारी प्रा.हर्षवर्धन वाघ व डॉ.परेश पोटफोडे, डॉ.संदीप गुरव यांनी संघव्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले तसेच टेबल टेनिस संघास डॉ.रणजित देव्हारे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा