You are currently viewing विज कंपनीने चुकीच्या पद्धतीने सुरू केलेली ग्राहकाची लूट थांबवावी – कणकवली राष्ट्रवादीची मागणी

विज कंपनीने चुकीच्या पद्धतीने सुरू केलेली ग्राहकाची लूट थांबवावी – कणकवली राष्ट्रवादीची मागणी

अन्यथा महिनाभरात जनआंदोलन, अधिकाऱ्यांना इशारा…

कणकवली

वीज कंपनीकडून अतिरीक्त आकार स्थिर आकार लावून चुकीच्या पध्दतीने सुरू असलेली लूट थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज कणकवली राष्ट्रवादीच्या माध्यमातून वीज अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.हा सर्व प्रकार महीनाभरात थांबवा त्यासाठी वरिष्ठ स्तरावर आवश्यक पाठपुरावा करा अन्यथा भविष्यात जिल्हाभरात जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.गेली काही वर्षे वीज बिलावर स्थिराकार अतिरिक्त आकार असे सांगून सर्वसामान्य ग्राहकांची वीज कंपनीकडून लूट होत आहे .वीज बिलाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम अशा प्रकारे चुकीचे आकार लावून वसूल केली जात आहे.
त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे .तर दुसरीकडे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या समस्या आहे याबाबतही जाब विचारण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अनीस नाईक ,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर,गणेश चौगुले,राष्ट्रवादी माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताड़े, सचिन सदडेकर, राजू वर्दम आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा