You are currently viewing स्त्रीला कशा प्रकारचा पुरुष आवडतो….

स्त्रीला कशा प्रकारचा पुरुष आवडतो….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सोनल गोडबोले यांचा अप्रतिम लेख*

*स्त्रीला कशा प्रकारचा पुरुष आवडतो….*

तो उत्तम सखा असावा … त्याने तिच्या मनावर प्रेम करावं… अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावुन यावं.. प्रत्येकवेळी आर्थिक मदत असेल असं नाही तर शाब्दिक सुख सुध्दा तितकाच आनंद देते…
पण काही वेळेला पुरूष शारीरिक संबधांसाठी स्त्रीकडे आकर्षित झाला तर ती पटकन त्याला स्विकारत नाही किवा त्याच्यावर प्रेम करत नाही..शारीरिक सुख हे तिच्यासाठी सगळ्यात शेवटी असतं आणि पुरूष इथेच चुकतात.. त्यांनी स्त्रीला जाणुन घेणं गरजेचं असतं..
बरेच जण याला सहमत असतील तुम्हाला प्रेम हवय,आदर हवाय तर तोच तिला आधी द्या.. मुळात स्त्रीकडे अप्रोच होण्याचा मार्गच चुकीचा असतो त्यामुळे तुम्हाला ती मैत्रीलायक पण समजत नाही आणि एकदा का तिच्या लक्षात आलं याला काय हवय की ती त्याला टाळायला सुरुवात करते..
मिठीतील मिठास तिला अनुभवायचा असतो.. तिला हातात हात घालुन काहीतरी कानात कुजबुजायचं असतं.. तिला एका कपात कॉफी प्यायची असते ,, तिला पावसात भिजायचं असतं.. मग ती बायको असो, प्रेयसी किवा मैत्रीण.. भावना त्याच ना…
कुठल्याही नात्यात तुम्ही असाल एकदा तिला हवं ते देउन तरी पहा… त्यानंतर तुम्हाला हवं असलेलं सुख ती खुलुन देइल.. कधी तिच्याकडे आई म्हणुन पहा तर कधी शिक्षिका म्हणुन सुध्दा… ती फक्त देइल आणि तुमची ओंजळ घ्यायला कमी पडेल..
शरीर सुखाच्या अलीकडे असलेला रोमान्स तिला स्वर्गीयसुख देतो.. तिच्या कपाळावर केलेला किस तिला समाधान देतो.. ओठावर केलेला किस हे जग इथेच थांबावं याची ग्वाही देतो..तिच्या उरोजाना केलेला स्पर्श हा तीची मादकता दाखवतो .. या स्पर्शातुन येणारी भावना दोघांना सुखाच्या पलीकडे घेउन जाते..
मित्रांनो मी नेहमीच माझ्या पुरूष मित्रांचा आदर करते म्हणुनच तो अजुन वाढावा म्हणुन मैत्रीदिनानिमित्त ही शब्दसुमने खास तुमच्यासाठी…

सोनल गोडबोले
लेखिका,अभिनेत्री..8380087262
बियॉन्डसेक्स,अनिरा ,,१३००० किलोमीटर

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =