You are currently viewing सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी

सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले. यापैकी राहुल राऊत व अद्वय देशपांडे यांनी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवले. चिराग चितारी याने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. पार्थ पाटील याने इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये झोनल सिल्वर मेडल व रुपये एक हजारचे पारितोषिक प्राप्त केले. आदित्य जगताप याने नॅशनल सायबर ऑलिंपियाडमध्ये झोनल मेडल व रुपये पाचशे पारितोषिक प्राप्त केले. मानस पाटकर याने इंटरनॅशनल सोशल सायन्स ऑलिंपियाडमध्ये मेडल ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =