You are currently viewing फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस

फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस

*जनजीवन विस्कळीत; सा. बा. विभागाच्या दुर्लक्षामुळे चिखलाचे साम्राज्य*

आमदार नितेश राणेंकडे करण्यात तक्रार; अजित नाडकर्णी

फोंडाघाट

*फोंडाघाट मध्ये सलग ४८ तास (२ दिवस) पावसाचे थैमान सुरू आहे. पाऊस पाहीजे पण सरी वर सरी. याठिकाणी ढगफुटी सदृष्य पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सार्वजनीक बांधकामचे दृर्लक्षामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गटाराच्या ऐवजी रस्त्यावरुन पाण्याचा लोट वाहत आहे. स्टँडवर गटार नसलेने एस टी स्टँडवर गुडघाभर पाणी साचल्याने स्टॅड वरील दुकानात जाताना कसरत करावी लागत आहे. या सर्व समस्यांचा पाढा आज आमदार मा.नितेशजी राणेंची भेट घेवुन त्यांना सांगणार असल्याचे व यातून काहीतरी तात्काळ मार्ग काढा अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =