You are currently viewing कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आज होणारा देवगड तालुका शिक्षक भारती स्नेहमेळावा तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित…

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आज होणारा देवगड तालुका शिक्षक भारती स्नेहमेळावा तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित…

जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांची माहिती

तळेरे
उद्या रविवार दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी कुणकेश्वर विद्यालयाच्या सभागृहात देवगड तालुका शिक्षक भारती स्नेहमेळावा व सावित्रीच्या लेकींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याची संपूर्ण तयारीही झालेली होती.परंतु आपल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचे वाढते संक्रमण लक्षात घेता व जिल्हाधिकारी सिंधदुर्ग यांनी यासंदर्भात दि.16 फेब्रुवारी रोजी लेखी आदेश काढून मेळावे/समारंभ ,तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम यांच्या आयोजनावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सभा ,मेळावे टाळावेत असे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सदर मेळावा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
तसेच गुरुवार दि. 18 रोजी जिल्हा कार्यकारिणी सभेत देवगड स्नेहमेळावा तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व तालुका अध्यक्ष हेमंत सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − one =