You are currently viewing जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस संगणक संच भेट

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस संगणक संच भेट

हणमंत वडीये ता कडेगांव येथील ‘येरळामाई जनसहयोग फाउंडेशन’ या संस्थेचे संस्थापक सभासद, पोलिस उपनिरीक्षक श्री. पवन मोरे साहेब यांनी मराठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक आप्पासाहेब जाधव सर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांना समजले, की आपल्या हणमंत वडीये गावची जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही मॉडेल स्कूल च्या दिशेने वाटचाल करत आहे. असे असताना सध्या शाळेला संगणक सेटची आवश्यकता भासत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
श्री. पवन मोरे साहेब यांनी तात्काळ निर्णय घेऊन लवकरच स्वतःमार्फत येरळामाई जनसहयोग फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शाळेस संगणक सेट मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तसेच अवघ्या काही दिवसांत तो मराठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. जाधव सर यांच्याकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था केली.

आज दिनांक 13/05/2022 रोजी सकाळी श्री. पवन मोरे साहेब यांचे वडील सतीशभाऊ मोरे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मोरे सर यांच्या हस्ते, तसेच गावातील श्री. जयराम मोरे, श्री. संजय मोरे, श्री. दत्तात्रय मोरे, श्री. मनोज मोरे व सचिन मंडले या मार्गदर्शक, हितचिंतकांच्या उपस्थितीत मराठी शाळेत जाऊन शाळेचे उपक्रमशील शिक्षक आप्पासाहेब जाधव सर यांच्याकडे संगणक सेट सुपूर्द करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा