You are currently viewing जिल्हा परिषद स्वातंत्र्याचा महोत्सव आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम

जिल्हा परिषद स्वातंत्र्याचा महोत्सव आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम

बांदा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्रशाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर तालुकास्तरावही प्रथम क्रमांक प्राप्त करून निलने सावंतवाडी तालुक्यातून जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते.
नुकताच ओरोस येथील शरद कृषी भवन सभागृहात पार पडलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या सांगता समारोपामध्ये नील बांदेकर याला जिल्हाधिकारी के .मंजूलक्ष्मी , मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नाईक यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. निलचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर , केंद्रप्रमुख संदीप गवस ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.


नीलला केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ,सरोज नाईक,उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर,शितल गवस,जागृती धुरी,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,रंगनाथ परब,जे.डी.पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे व पलकांचे मार्गदर्शक लाभले. निलने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =