मालवण
जिल्हाधिकारी आणि बंदर विभाग तसेच पर्यटन संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यातर्फे दि. २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ व २ ते ४ या वेळेत जलक्रीडा व्यावसायिक आणि बोट चालक यांच्यासाठी विनामूल्य बोट सुरक्षितता प्रशिक्षण होणार आहे. बोट मालक, चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे