You are currently viewing सावंतवाडी गरड, श्री स्वामी समर्थ नगर येथे जिल्हास्तर नगरोत्थान निधी मधून मंजूर उद्यानाच्या कंपाउंड वॉल कामाचा शुभारंभ

सावंतवाडी गरड, श्री स्वामी समर्थ नगर येथे जिल्हास्तर नगरोत्थान निधी मधून मंजूर उद्यानाच्या कंपाउंड वॉल कामाचा शुभारंभ

नाम.दीपक केसरकरांनी केलं तात्काळ मंजूर काम

सावंतवाडी गरड, स्वामी समर्थ नगर येथील नाईक पोलिसांच्या घरासमोरील उद्यानाच्या सभोवताली कंपाउंड वॉल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर व विश्वनाथ नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
गरड स्वामी समर्थ नगर येथील उद्यानाच्या कंपाउंड वॉलचे काम जिल्हास्तर नगरोत्थान निधीमधून नाम.दीपक भाई केसरकर यांनी मंजूर केले आणि तात्काळ काम सुरू देखील झाले. त्यामुळे गरड प्रभागातील नागरिकांनी नाम.दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले आहेत. नगरोत्थान निधीमधून मंजूर कंपाउंड झालेले सदरचे कंपाउंड वॉलचे काम अंदाजे १४.७७ लाख रुपयांचे आहे. कंपाउंड वॉल काम मंजुरीसाठी श्री.सुजित कोरगावकर, श्री.विशाल सावंत, यांनी पाठपुरावा केला तर माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सौ.भारती मोरे, श्री.राजन पोकळे यांनी विशेष सहकार्य केले. सावंतवाडी शहराचा विकास नाम.दीपक केसरकर यांच्याच माध्यमातून होत आला आहे. दीपक केसरकर नगराध्यक्ष असतानाच सावंतवाडी शहर विकासाचे व्हिजन त्यांनी तयार केले आणि सावंतवाडी शहराचा कायापालट केला होता. मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना नेहमीच ते सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात.
या कार्यक्रमासाठी विनायक भिसे, सौ.भिसे, विचारे मॅडम, श्री वसव नाईक, राणे, श्री मेस्त्री, श्री व सौ पाटणकर, श्री. गावडे, श्री. नाईक, उमेश पाटणकर आणि प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा