पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मनोज रावराणे यांच्याकडून अर्ज दाखल

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मनोज रावराणे यांच्याकडून अर्ज दाखल

कणकवली

कणकवली पं स सभापतीपदासाठी मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपले नामनिर्देशन पीठासीन अधिकारी रमेश पवार यांच्याकडे दाखल केले. खासदार नारायण राणे यांनी पं स सभापतीपदी मनोज रावराणे यांच्या नावाला पसंती दिल्याचा बंद लिफाफा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात पं स सदस्य आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोडला. खासदार राणे यांनी सुचविल्यानुसार मनोज रावराणे यांनी पं स सभागृहात दाखल होत पं स सभापती पदासाठी आपले नामनिर्देशन दाखल केले. माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, जि प बांधकाम सभापती बाळा जठार, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोज रावराणे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. यावेळी पं स सदस्य महेश लाड, प्रकाश पारकर, गणेश तांबे, भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे,सूचिता दळवी, स्मिता मालडीकर, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, भाजपा जिल्हा ओर प्रसिद्धिप्रमुख बबलू सावंत, महेश गुरव, स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा