You are currently viewing आरोग्य विभागाच्या 14 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आरोग्य विभागाच्या 14 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 14 रुग्णवाहिकांचा लोकार्पण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग झाले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य नागेंद्र परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी  जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा