You are currently viewing वेंगुर्ला राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची जयंती साजरी

वेंगुर्ला राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची जयंती साजरी

मवेंगुर्ला

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती वेंगुर्ला येथे साजरी करण्यात आली. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दूरसंचार क्रांती, संगणक क्रांती, पंचायत राज कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्यादा अधिकार देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण केले, 18 वर्षा वरील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला अशी अनेक कामे करून महासत्तेकडे वेगाने जाणा-या भारताचा पाया रचला अशी स्वर्गीय राजीव गांधींच्या कामांच्या आठवणीना उजाळा उपस्थितांनी दिला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे,अब्दुल शेख, असद मकानदार,सनगर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =