You are currently viewing सावंतवाडी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पंक्तीत…

सावंतवाडी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पंक्तीत…

अल्पावधीतच उज्वल भविष्याकडे वाटचाल…

सावंतवाडी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या पंक्तीत विराजमान झाल्याचे पहावयास मिळाले.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू उर्फ सच्चिदानंद परब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात काही ठिकाणी मोठमोठी पोश्टर लावण्यात आली आहेत. सावंतवाडी नगरपलिकेच्या समोरच्या अशोक वृक्षाच्या आधारावर संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठे पोश्टर लागले असून त्यावर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या बरोबरीने माजी नगरसेवक मनोज नाईक व शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांची छबी झळकली आहे. त्यामुळे अल्पावधीतच अजय गोंदावळे यांनी भारतीय जनता पक्षात भरारी मारल्याची प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करत आहेत.
भारतीय जनता पक्ष हा कडक शिस्तीचा आणि संघाच्या विचारधारेवर चालणार पक्ष असून पक्षाचा बॅनर असो वा पत्रक त्यावर सर्व मायने, फोटो हे मानानुसारच लावले जातात ही वस्तुस्थिती आहे. परंतु सावंतवाडीच्या नगरपालिकेसमोर लागलेल्या या बॅनर वरील छायाचित्रे म्हणजे सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा