You are currently viewing बनशंकरी देवी उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रम

बनशंकरी देवी उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रम

बनशंकरी देवी उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी

इचलकरंजी येथील गावभाग परिसरात श्री. बनशंकरी देवी मंदिरामध्ये उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार १९ व शनिवार २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक विधी पार पडणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बनशंकरी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले.

येथील गावभाग परिसरातील लिंगणगुडी, टाकवडे वेसजवळील श्री बनशंकरी देवीचे मंदिर जागृत असून त्याला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. कोष्टी समाजासह इतर समाजाची आराध्य देवता म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. या मंदिराचा २००१ साली जीर्णोद्धार करण्यात आला होता. सध्या या मंदिरातील उत्सवमूर्ती नव्याने प्रतिष्ठापना करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन १९ व २० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडे ९ वाजता श्री चौंडेश्वरी मंदिर ते श्री बनशंकरी मंदिर, टाकवडे वेस असा उत्सवमूर्ती सवाद्य पालखी सोहळा आणि शनिवार २० ऑगस्ट रोजी रुद्राभिषेक, होमहवन करण्यात येणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी समाजबांधव, भाविकांनी यात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. योगदानासाठी श्री बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे (९८५०५९०८३८) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा