कुडाळ :
पिंगुळी येथे १९ ऑगस्ट रोजी साई कला-क्रीडा मंडळ पिंगुळी पुरस्कृत आणि पिंगुळी मित्र मंडळ आयोजित गावाच्या वतीने एकमेव भव्य-दिव्य दहीहंडी महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. म्हापसेकर तीठा येथील आनंदवन कॉम्प्लेक्स कंपाउंड, कुडाळ वेंगुर्ला रोड येथे हा दहीहंडी उत्सव सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे.
या दहीहंडी उत्सवाचे उदघाटन कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, विधी तज्ज्ञ संग्राम देसाई यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पिंगुळी गावची सात थराची मानाची दहीहंडी फोडणाऱ्या संघास रोख रक्कम रु.२१ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. यामध्ये दहीहंडीचे जे संघ सहभागी होतील व पिंगळीच्या या दहीहंडी सलामी देतील त्यामध्ये पहिल्या चार थरांसाठी रू.१५००/- व सन्मानचिन्ह., पाचव्या थरासाठी रु.२०००/- व सन्मानचिन्ह, सहाव्या थरासाठी रु.३०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच डीजेच्या तालावर विविध नृत्यविष्कार, आकर्षक, रोषणाई, पाण्याची सतत बरसात होणार आहे. एलईडी स्क्रीन वर संपूर्ण दहीहंडीचे सादरीकरण होणार आहे. तसेच त्याला ढोल पथकाची साथ असणार आहे. या विविध आकर्षणासह आयोजित करण्यात येत. असलेल्या दहीहंडी कार्यक्रमात पिंगुळीवासीयांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन साई कला-क्रीडा मंडळ पिंगुळी आणि दहिहंडी मित्र मंडळ पिंगुळी यांनी केले आहे.