You are currently viewing सावंतवाडी शहरात स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांना पहिलं प्राधान्य द्या-  मनसेची मागणी

सावंतवाडी शहरात स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांना पहिलं प्राधान्य द्या-  मनसेची मागणी

सावंतवाडी

शहरात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची मुजोरी वाढत आहे परिणामी येथील स्थानिक व्यापारी व महिला विक्रेत्यांमध्ये जागेवरून वाद उद्धवत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने बाहेरील व्यापाऱ्यांना आवर घालावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आवर घालू असं थेट इशारा मनसेचे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरात गेली काही वर्षे बाहेरुन येणार्या परप्रांतीय व्यापार्यामुळे स्थानिकावर तसेच ग्रामीण भागातून येणार्या महीला विक्रेत्यांवर अन्याय होत आहे, हिदूधर्मीयाचा लाडका सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे हा सण अवघ्या कोकणवासियासाठी महत्त्वाचा मानला जातो. यावेळी पालिका प्रशासनाने स्थानिक व्यापारी महिला विक्रेत्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन बाजारपेठेमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी अशा व्यापाऱ्यावर अन्याय होताना दिसल्यास मनसे स्वतः बाजारपेठेत उतरून बाहेरील विक्रेत्यांची मुजोरी दाबून टाकणार आहे त्यामुळे प्रशासनाने याबाबत वेळीच खबरदारी घ्यावी व योग्य ते नियोजन करावे असे कौस्तुभ नाईक यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी बाजारपेठेतील सध्याची स्थिती लक्षात घेता बाहेरून येणाऱ्यापर्यंत व्यापाऱ्याला या ठिकाणी जास्त किंमत मिळते परंतु स्थानिक व्यापारी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला विक्रेत्यांना या ठिकाणी दुय्यम दर्जा दिला जातो बऱ्याच वेळा अशा महिलांना बाजारपेठेत आपल्या वस्तू विकण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही त्यामुळे कुठेतरी अडगळीत बसून त्यांना व्यवसाय करावा लागतो हे बाहेरील व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांशो अरेरावी करून प्रसंगी दादागिरी करतात. त्यामुळे आपल्याच शहरात कुठेतरी स्थानिकांना अपमानित व्हावे लागत आहे. हा प्रकार थांबलाच पाहीजे अन्यथा मनसे गप्प बसणार नाही. मनसे हा स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याचे श्री नाईक म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा