वेंगुर्ला (तुळस) :
75 व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत तुळस येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तुळस गावातील भारतीय सैन्यदलात कामगिरी बजावलेले श्री मधुकर राऊळ, श्री प्रभाकर बेहेरे, श्री विक्रांत चुडजी, श्री प्रकाश नाईक, श्री रंगनाथ मांजरेकर, श्री अंकुश ठुंबरे, शहीद जवान श्री परशुराम नाईक यांच्या पत्नी, तसेच तलाठी ए. टी. गावडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ सैनिक श्री प्रभाकर बेहेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दहावी, बारावी चे प्रथम तीन क्रमांक चे विद्यार्थी तसेच संगीत क्षेत्रातील श्री.पुरुषोत्तम परब (संगीत विशारद), श्री.सिद्धेश नाईक (संगीत विशारद), श्री अनंत उर्फ मनीष तांबोसकर (M.A-पखवाज) यांचा गौरव करण्यात आला. तसेच दरवर्षी तुळस ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशाताई यांचाही गौरव करण्यात आला.
सरपंच श्री शंकर घारे, उपसरपंच श्री सुशील परब, ग्रामपंचायत सदस्य शेखर तुळसकर, जयवंत तुळसकर, सोनू आरमारकर, चंद्रे परब, श्रद्धा गोरे, सुष्मिता बेहेरे, संजना परब, हर्षदा नाईक, ग्रामविकास अधिकारी एस. जी. चव्हाण, तुळस गावचे माजी सरपंच श्री विजय रेडकर, श्री संदीप पेडणेकर, सौ. भाग्यलक्ष्मी घारे, श्री. महादेव उर्फ आपा परब, आत्माराम उर्फ भाऊ नाईक, माजी पंचायत समिती सभापती श्री यशवंत उर्फ बाळू परब, तुळस सोसायटी चेअरमन श्री संतोष शेटकर, व्हाइस चेअरमन श्री संजय परब, तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रथमेश सावंत तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र उर्फ नाना राऊळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केले.