You are currently viewing पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

*पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*

*अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचे आयोजन*

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
*मराठा समाज हॉल कुडाळ* याठिकाणी दिनांक *४ जुलै २०२५* रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता ही स्पर्धा होणार असून लहान गट व खुला गट या दोन गटांमध्ये सदर स्पर्धा होणार आहे. लहान गट हा १४ वर्षापर्यंतचा असून ३० जून २०२५ पर्यंत १४ वर्षे पूर्ण झालेले स्पर्धक या गटात सहभाग घेऊ शकतात.
लहान गटासाठी *पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे कार्य* हा विषय असून खुल्या गटासाठी *पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची सावंतवाडी संस्थानची सामाजिक सुधारणा* हा विषय आहे.
खुला गटासाठी प्रथम पारितोषिक १५००₹ व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक १०००₹ व आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक ७५०₹ व आकर्षक ट्रॉफी तर लहान गटासाठी प्रथम पारितोषिक १०००₹ व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक ७५०₹ व आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक ५००₹ व आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आलेले असून सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक गटात नोंदणी केलेल्या पहिल्या पंधरा स्पर्धकांनाच स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
या स्पर्धेच्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत. वक्तृत्व स्पर्धा लहान गट व खुला गट या दोन गटात होणार असून लहान गटासाठी आधारकार्ड सोबत आणणे गरजेचे आहे. लहान गटातील स्पर्धकाला ४ ते ५ मिनिटांचा आणि खुल्या गटासाठी ६ ते ७ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० जून २०२५ पूर्वी नावनोंद‌णी करावी. परीक्षकांनी केलेल्या गुणांकनानुसार विजेते घोषित करण्यात येतील सदर स्पर्धा ही मराठी भाषेतून होईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील तो स्पर्धकांना मान्य असेल. वाद घालणाऱ्या स्पर्धकांना बाद ठरविण्यात येईल.आयोजकांनी वेळोवेळी घोषित केलेले बदल स्पर्धकांना मान्य असतील. स्पर्धक सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असावा अथवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण घेणारा असावा. (जिल्ह्याबाहेरील स्पर्धाकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉलेजमध्ये शिकत असलेल्या कॉलेजचे आयकार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.)स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे. दिलेल्या सूचनाचे पालन करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच नोंदणी साठी विनय गायकवाड – ८४४६८२९८८९, गणेश नाईक – ९८६०२५२८२५ यांना संपर्क करावा असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केले आहे.

———————————————-
*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================

11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*

*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================

11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*

*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================

*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================

*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )

========================

*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )

========================

*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*

विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*

8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा