You are currently viewing शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला

इर्शाद शेख फाउंडेशन व वेंगुर्ला शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इर्शाद शेख फाउंडेशन व वेंगुर्ला शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शस्त्रक्रिया नोंदणी शिबीरात भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण येथील डाॅ. दिपक शिंदे एम्.एस्. सर्जरी,डाॅ.सुयश इंगळे एम्.एस्.ऑर्थोपेडीक, डाॅ.गुरूजीत चड्डा एम्.एस. इ.एन्.टी.,डाॅ.विश्वंभर देवकर गायनॅकॉलॉजिस्ट, डाॅ.अक्षय गांगुर्डे एम्.डी.मेडिसीन,डाॅ.सत्यम जाधव ऑपथोमाॅलाजीस्ट असे तज्ञ डाॅक्टर्सनी रूग्णांची तपासणी केली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण येथे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोफत करण्यात येणार आहे.मोफत शस्त्रक्रियेबरोबरच शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णालयात रुग्णासोबत असणा-या एका व्यक्तीचा राहण्याची जेवणाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे.

या शिबीराला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी दादा परब,शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष कृतीका कुबल, माजी नगराध्यक्ष संदेश निकम,माजी नगरसेविका सुमन निकम, वसंत तांडेल,नंदन वेंगुर्लेकर,ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ल्याच्या अधीक्षक डाॅ. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.गृहिता राव, असद मकानदार इत्यादी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा