You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा भेट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा भेट

माजी विद्यार्थ्यांकडून तळेरे हायस्कूलला राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा भेट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत माजी विद्यार्थी स्वप्निल कल्याणकर , निखिल जमदाडे , सुरज बिद्रे , सचिन वाडेकर यांजकडून वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेला राष्ट्रपुरूषांचे फोटो भेट म्हणून देण्यात आले . तसेच सागर डंबे , मिथिल डंबे यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे लाडू व चाॕकलेटस उपलब्ध करून दिले.
यावेळी चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर , शरद वायंगणकर , तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष , राजू जठार , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ , अनुष्का नर , चव्हाण , जेष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे , ए.बी. कानकेकर , पी. एन काणेकर , डी.सी.तळेकर पी.एम.पाटील , एन.बी. तडवी , व्ही.डी.टाकळे , ए.बी. तांबे , एस.एन. जाधव , एस.यु,सुर्वे , एन.पी.गावठे , ए.पी.कोकरे , समीर चव्हाण , अंकीत घाडीगावकर , लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विद्यार्थी , पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेली आस्था जपत राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा दिल्याबद्दल तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्याबद्दल संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − three =