तुझ्यासाठी…
तुझ्यासाठी...

तुझ्यासाठी…

तुझ्यासाठी…
कधी कधी वाटते…
तुझ्या गालावरची खळी व्हावे,
तू हसल्यावर खुलता तरी येईल.
कधी कधी वाटते…
तुझ्या ओठांवरची लाली व्हावे,
तुझ्या ओठांना भेटता तरी येईल.
कधी कधी वाटते…
तुझ्या हातातील रुमाल व्हावे,
तुझ्या गालांवर टेकता तरी येईल.
कधी कधी वाटते…
तुझं रात्रीतलं स्वप्न व्हावे,
तुझ्या पापण्यांवर जगता तरी येईल.
कधी कधी वाटते…
काय होऊ नी काय नको?
तुझ्यासाठी मी तूच व्हावे,
म्हणजे…
तुझ्याच सोबत राहता तरी येईल.
(दीपी)
८४४६७४३१९६.

प्रतिक्रिया व्यक्त करा