You are currently viewing जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तळेरे ज्युनियर काॕलेजचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तळेरे ज्युनियर काॕलेजचे यश

वामनराव महाडीक ज्युनियर काॕलेजचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

तळेरे वाणिज्य शाखेची स्नेहल तळेकर द्वितीय

कै. नाम. भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्नेहल तळेकर द्वितीय

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरे ने यश संपादन केले . यामध्ये ज्युनियर काॕलेजची १२ वी वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी स्नेहल संतोष तळेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यावेळी संचालिका सावंत, संचालक राजेश मोंडकर, नागवेकर,बागवे , सचिव व्ही. बी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, मुख्याध्यापक धोंड ,यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम, ट्राॕफी, प्रमाणपत्र देऊन तिला गौरवण्यात आले . ज्युनियर काॕलेज मर्यादित या स्पर्धेत जिल्ह्यातून जवळपास ३६ पेक्षा जास्त स्पर्धेक सहभागी झाले होते .
राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर काॕलेज सावंतवाडी येथे कै. नाम.भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत ‘कोरोनाने आम्हाला काय शिकवले ?’ या विषयावर स्नेहल तळेकर हिने आपले विचार मांडले. यामध्ये आपल्या वक्तृत्वाची छाप पाडत स्नेहल तळेकर हिने हे यश संपादन केले.यासाठी तिला प्राध्यापिका एस.एन जाधव , पी. एम्. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तळेरे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरुणकर , शरद वायंगणकर , संतोष तळेकर, संतोष जठार , निलेश सोरप , उमेश कदम , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक , ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांनीं अभिनंदन केले .

डावीकडून उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, संचालिका सावंत,   मुख्याध्यापक धोंड, सचिव व्ही. बी. नाईक, संचालक राजेश मोंडकर,  नागवेकर,बागवे, प्रा.एस.एन जाधव यांच्या उपस्थितीत पारितोषिक  स्विकारताना स्नेहल तळेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा