You are currently viewing कुडाळ येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळातर्फे आगळीवेगळी पुरुषांची वटपौर्णिमा साजरी

कुडाळ येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळातर्फे आगळीवेगळी पुरुषांची वटपौर्णिमा साजरी

कुडाळ :

आज १४ जून रोजी ज्याची जगभरात नोंद घेण्यात आली. त्या पुरुषांच्या वटपौर्णिमा प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळ गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २०२२ पासून उमेश गाळवणकर व डॉ संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली वटपौर्णिमा गेली बारा वर्ष अव्याहतपणे चालू आहे. संसाराच्या रहाटगाड्यात पुरुषाला समर्थपणे साथ देणाऱ्या पत्नी प्रति श्रद्धा भाव व आदरभाव व्यक्त करण्यासाठी पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, भारतीय संस्कृतीमध्ये आणि संसारामध्ये स्त्रियांच्या सहकार्याचा वाटा मोठा आहे याची जाणीव ठेवून-ही वट पौर्णिमा साजरी केली जाते.

वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती नवरा म्हणून मिळावा या पत्नी च्या व्रताला जोडून आपल्या संसाराचा भार उचलणाऱी पत्नी जन्मोजन्मी आपल्याला जोडीदारीण म्हणून मिळावी, या पवित्र हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव येथे वडाची पूजा करून येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक दरवर्षी वडाची पूजा करून वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात ‌.

यावर्षी सुद्धा उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर , डॉ. सुरज शुक्ला, डॉ.व्यंकटेश भंडारी, प्रा.अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा.प्रथमेश हरमलकर, राजू कलिंगण, श्री जांभळे, श्री सुरेश वरक, श्री पालव, प्रसाद कानडे, संतोष पडते, सुनील गोसावी, गजा टारपे इ. ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांनी मोठ्या उत्साहात वडाला फेर्‍या मारून, वटपूजा करून पत्नीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे मागणे मागून वटपौर्णिमा साजरी केली.

 

यावेळी कुडाळ परिसरातील नागरिक, प्रतिष्ठित मंडळी, स्त्रिया मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कुडाळ येथील या मंडळींच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित लोकांनी कौतुक केलंच ;पण त्याचबरोबर वडाला फेर्‍या मारायला आलेल्या महिलानी सुद्धा समाधान व्यक्त केलं. जर नवऱ्यासाठी आपण निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतो, देवाकडे मागणे मागतो तर पुरुषांनी सुद्धा या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्त्री प्रती आदर व्यक्त करण्याची गरज व्यक्त केली. त्यादृष्टीने हा उपक्रम स्त्री चा खऱ्याअर्थाने सन्मान करणारा आहे. असे सांगत समाधान व्यक्त केले. या मंडळींच्या आगळ्यावेगळ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 2 =