You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत मालवण देऊळवाडा येथे पदयात्रा 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत मालवण देऊळवाडा येथे पदयात्रा 

मालवण

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षा मार्फत संपूर्ण देशात आजादी गौरव पदयात्रा क्रांतीदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक तालुक्यात काढली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात महात्मा गांधीनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथून पदयात्रेची सुरवात करण्यात आली होती. 13 ऑगस्ट रोजी ही पदयात्रा मालवण देऊळवाडा येथून काढण्यात आली. पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता त्याच बरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीना उजाळा मिळाला. यावेळी देशभक्तीपर गीतानी वातारण उल्हसित झाले होते. ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ या घोषणानी वातावरण देशभक्तीमय झाले होते. पदयात्रा बाजारपेठेत आली असता सर्व व्यापारी उभेराहून डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला अभिवादन करत होते. या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी
विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, शहर अध्यक्ष जेंम्स फर्नांडिस, महिला शहराध्यक्ष गीता नेवाळे, शोभना चिंदरकर, चेतना होडवडेकर, सौ, सुर्वे, योगेश्वर कुर्ले, अमृत राऊळ, पपु माणगांवकर, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर, हेमंत माळकर, श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eighteen =